साहित्य :-
१. १ कप बारीक चिरलेला पालक
२. १ कप शिजवलेली मुगाची डाळ
३. १/२ कप बारीक चिरलेला कांदा
४. बारीक चिरलेला छोटा टोमॅटो
५. अर्धा चमचा हळद
६. २ सुक्या लाल मिरच्या
७. फोडणीसाठी तेल व जीरं
८. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं
९. चवीनुसार मीठ
कृती:-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून त्यात जीरं घालावं. जीरं थोडं तडतडल की त्यात कढीपत्ता, हळद, सुक्या लाल मिरच्या व बारीक केलेला कांदा घालावा. कांदा मऊ झाला की मग त्यात टोमॅटो घालून तो मिळून येईपर्यंत शिजवावे. मग त्यात पालकाची धुवून चिरलेली पाने घालावीत. ५ ते ७ मिनिटे ही पाने शिजू द्यावी. मग शिजवलेली मुगाची डाळ घालावी. चवीनुसार मीठ घालून ही पालकवाली दाल ५ मिनिटे अजून शिजवावी. भाताबरोबर गरम गरम serve करावी.
वाढणी :- २ ते ३ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा