साहित्य :-
१. १ कप खवा
२. १ चमचा बेसन
३. अर्धा चमचा खसखस
४. २ कप पिठीसाखर
५. ३ ते ४ चमचे साजूक तूप
६. वेलची पूड अर्धा चमचा
७. चिमुटभर केशर
८. १ ते दीड कप कणिक
९. कणिक मळायला पाणी
कृती :-
प्रथम पोळीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्यावी. कणिक मळताना चिमुटभर मीठ घालावे. गोड पदार्थाला अस मीठ घातल्याने छान चव येते. मग कढईमध्ये २ चमचे तूप घालावे. ते गरम झाले की त्यात खवा परतावा. चं गुलाबी रंग आला खव्याला की तो एका वाडग्यात काढून घ्यावा. परत थोडं तूप घालून त्यावर बेसन भाजून घ्यावं. बेसन छान भाजलं गेलं की ते खव्यामध्ये घालावं. पुन्हा तूप घालून थोडी खसखस भाजून घ्यावी. ती देखील खव्यावर घालावी. या मिश्रणात पिठीसाखर, वेलची पूड व केशर घालावे. चमच्याने दुध घालत हा खवा छान मळून घ्यावा. साधारणपणे मुठीत खवा घट्ट दाबला तर त्याची मुठ तयार झाली पाहिजे इतपत हा खवा मळून घेतला की पोळ्या करायला घ्याव्यात. कणकेच्या २ लाट्या घ्याव्यात. छोट्या दोन पोळ्या लाटून त्यातील एका पोळीवर खव्याची मूड घालावी व वरून दुसरी पोळी ठेवून कडा घट्ट बंद करून घ्याव्यात. हलक्या हाताने पुन्हा पोळी लाटावी. हि पोळी लाटताना थोडी तांदळाची पिठी लावावी. म्हणजे पोळी सहजतेने लाटली जाईल. तवा मध्यम आचेवर तापवून हि पोळी द्नही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. पोळी भाजताना बऱ्याचदा खवा बाहेर येतो व फसफसल्यासारखा दिसतो. त्यामुळे तव्याच्या तापमानाकडे लक्ष द्यावे. तवा जास्त तापला तर पोळी तव्यावर फुटू शकते. मध्यम आचेवरच या पोळ्या खरपूस भाजून घ्याव्यात. वरून तूप घालून गरम गरम serve कराव्यात.
वाढणी :- या साहित्याच्या साधारणपाने १० ते १२ पोळ्या होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा