साहित्य :-
१. १ कप साबुदाणा
२. पाव कप दाण्याचे कूट
३. २ ते ३ मिरच्या
४. अर्धा चमचा जीरं
५. २ ते ३ चमचे तूप
६. अर्धा चमचा साखर
७. चवीपुरतं मीठ
८. ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:-
प्रथम साबुदाणा थोड्याश्या पाण्यामध्ये भिजवावा. साबुदाणा कमीत कमी ५ ते ६ तास भिजला पाहिजे. भिजलेला साबुदाणा हाताला अगदी मऊ लागतो. त्याला नख लावले तर लगेच तुटतो. पण तरीही प्रत्येक दाणा अगदी वेगळा वेगळा दिसतो. अशाप्रकारे साबुदाणा तयार झाला कि मग एका कढईमध्ये तूप तापवून घ्यावं. त्यात जिरं घालावं व ते तडतडलं की मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. फोडणी झाली की लगेचच त्यात भिजलेला साबुदाणा घालावा. दाण्याचं कूट घालावं. मीठ व साखर घालून छान मिक्स करून घ्यावं. जर खिचडी थोडी कोरडी वाटत असेल तर पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून एक वाफ आणावी. खोबरं व कोथिंबीर घालून सजवावी व गरम गरम serve करावी. आवडत असल्यास लिंबू पिळून हि गरम गरम खिचडी खावी.
आवडत असल्यास या खिचडीमध्ये उकडलेला बटाटादेखील घालतात.
केवळ उपसालाच नाही तर इतर वेळेलाही अशी खिचडी दुपारच्या खाण्यासाठी केली जाते. उपासाच्या दिवसाचा हा अविभाज्य पदार्थ आहे.
वाढणी :- १ ते २ माणसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा