साहित्य :-
१. २ पिकलेली केळी
२. १ ते दीड कप दही
३. चिमूटभर मीठ
४. ३ ते ४ चमचे साखर
५. १ मध्यम आकाराची हिरवी मिरची
६. कोथिंबीर
कृती:-
दोन्ही केळी सोलून कापून घ्यावी. त्यात दही, साखर, व मीठ घालावे. हिरवी मिरची बारीक चिरून घालावी व आवडत असल्यास कोथिंबीर घालावी. ही कोशिंबीर पोळीबरोबर छान लागते किंवा नुसती खायला पण छान वाटते. लहान मुलांना ही कोशिंबीर देताना मिरची न घालता दिली तरी चविष्ट लागते. उपवासाला देखील नुसती खायला ही कोशिंबीर चालते.
वाढणी :- २ ते ३ माणसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा