साहित्य :-
१. २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
२. पेरभर आलं
३. २ ते ३ लसूण पाकळ्या
४. २ ते ३ मिरच्या
५. अर्ध्या लिंबाचा रस
६. चवीनुसार मीठ
७. बारीक चिरलेली कोथिंबीर
८. २ कप पोळीची कणिक
९. कणकेच्या गोळ्याला लावण्यासाठी तेल
१०. पराठे भाजण्यासाठी तूप किंवा बटर
कृती:-
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे गार झाल्यावर ते हाताने मॅश करून घ्यावेत. आलं, लसूण व मिरची थोडंसं मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. हे मिश्रण बटाट्यामध्ये घालावे. त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान गोळा मळून घ्यावा. पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. थोडेसे तेल लावून ही कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. या पोळीच्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. तसेच बटाट्याच्या सारणाचेही गोळे करावेत. पोळीच्या कणकेचा एक गोळा घेऊन तो थोडासा लाटावा व त्यात बटाट्याच्या सारणाचा गोळा घालून सर्व बाजूनी बंद करून घ्यावे. हा गोळा पिठात घोळवून बंद बाजू खाली ठेवून हलक्या हाताने लाटावा. तवा मध्यम आचेवर तापवून घ्यावा व पराठा दोन्ही बाजूनी तूप किंवा बटर लावून भाजून घ्यावा. कोबीच्या कोशिंबिरीसोबत व लोणच्यासोबत आलू पराठा गरम गरम serve करावा.
वाढणी :- २ ते ३ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा