साहित्य :-
१. अर्धी वाटी श्रावण घेवडा
२. अर्धी वाटी गाजर
३. अर्धी वाटी बटाटा
४. अर्धी वाटी मटारचे दाणे
५. पाव वाटी सिमला मिरची
६. अर्धी वाटी पनीर
७ . मध्यम आकाराचा कांदा
८ . १ चमचा आलं
९ . १ चमचा लसूण
१० . ८ ते १० काजू
११ . अर्धा चमचा तिखट
१२ . अर्धा चमचा गरम मसाला
१३. पाव चमचा हळद
१४. पॅपरीका
१५. अर्धा कप heavy whipping cream
१६. पाव चमचा जीरं
१७. १ वाटी टोमॅटो प्युरे
१८. अननस, सफरचंद, द्राक्षं प्रत्येकी ३ ते ४ चमचे
१९. बेदाणे ३ ते ४ चमचे
कृती :- मसाला
प्रथम तेलावर चिरलेला कांदा, चिरलेला आलं, लसूण व काजू परतून घ्यावेत. हा मसाला मिक्सरमधून बारीक वाटावा. हा मसाला बनवून ठेवला तर फ्रीज मध्ये साधारण २ ते ३ आठवडे चांगला टिकतो व पनीर- मटर, मशरूम- मटर, कोफ्ता करीची करी बनवण्यासाठी वापरता येतो.
भाजीची कृती :-
सर्व भाज्या चौकोनी कापून घ्याव्यात. एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे. मग या तेलावर प्रथम भाज्या परतून घ्याव्या. कढईच्या मधोमध जागा करून पनीर चे चौकोनी तुकडे त्यात घालावेत व परतून घ्यावे. पनीर तळू नये. पनीर पहिले तळून घेतलं तर त्याचा मऊपणा जाऊन ते चिवट होतं. मग त्यात वरील मसाला घालावा. थोडावेळ परतून मग टोमॅटो प्युरे घालावी. थोडसं पाणी घालून भाजी थोडावेळ शिजवावी. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, पॅपरीका व मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. भाजी पूर्ण शिजली की मग त्यात अननस, सफरचंद व द्राक्षं घालावीत. बेदाणे घालून भाजी परत शिजू द्यावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालावे. सर्वात शेवटी whipping cream घालून भाजी अजून २ मिनिटं शिजवावी. ही भाजी पोळी सोबत किंवा जीरं राइस सोबत अतिशय छान लागते.वाढणी :- २ ते ४ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा