साहित्य :-
१. दीड कप सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा
२. १ चमचा यीस्ट
३. पाव चमचा साखर
४. १ कप कोमट पाणी
५. १ चमचा बटर
कृती :-
प्रथम एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा घ्यावा. जर तुम्ही मैदा वापरणार असाल तर त्यात अर्चा चमचा मीठ घालावं. पण सेल्फ रायझिंग फ्लोअरला मीठ घालायची गरज नाही. एका छोट्या वाटीमध्ये यीस्ट घेऊन त्यात साखर घालावी. कोमट पाण्यातील थोडं पाणी घालून यीस्ट active होण्यासाठी १० मिनिटे ठेवावे. पिठात हे यीस्ट घालून लागेल तेवढ्या पाण्यात पुरणाच्या पोळीसारखी पातळ कणिक मळावी. बटर लावून ही कणिक ५ ते ७ मिनिटे मळावी. हा daugh हाताला चिकटणार नाही अशा स्टेजला येईपर्यंत मळावा. मग काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेऊन वरून झाकावा. १ तास हा daugh ferment होऊ द्यावा. बकिंग ट्रेला तूप व मैदा लावून घ्यावा. ferment झालेल्या कणकेला हाताने बुक्क्या मारून त्यातील हवा काढावी व गोळा पुन्हा मळून घ्यावा. हाताला थोडे पीठ लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रे मध्ये एकमेकाला थोडेसे चिकटतील असे ठेवावे. पुन्हा झाकून हे गोळे अर्धा तास ferment होऊ द्यावेत. तोवर ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. अर्ध्या तासाने ह्या गोळ्यांना वरून दुधाचा हात लावून बेक करायला ठेवावे. ३० मिनिटे बेक झाल्यावर बाहेर काढून लगेचच या पावला बटर लावावे. त्यामुळे पाव मऊ राहतो. हा पाव एका जाळीवर थंड होण्यासाठी ठेवावा. थंड झाला की एकमेकांपासून अलग करून मधोमध कापावा. वडा पाव, पाव भाजी किंवा अच्छी दाबेली सारख्या पदार्थांमध्ये हा पाव वापरता येऊ शकतो. तुमच्या ओव्हन नसेल तर convection microwave मध्ये १८०c वर तुम्ही हा पाव बेक करू शकता.
वाढणी :- या साहित्यात ५ ते ६ पाव होतील.
वडा बनवण्याची कृती या पत्त्यावर पहावी :- http://migruhini.blogspot.com/2012/04/blog-post_30.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा