साहित्य :-
१. दीड कप किसलेला सुकं खोबरं
२. पाऊण वाटी साखर
३. २ चमचे खसखस
४. ५ ते ६ बदाम
५. ४ ते ५ काजू
६. १ चमचा वेलची पूड
७. चिमुटभर केशर
८. २ चमचे खवा
कृती :-
सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. खिरापत serve करताना थोडासा खवा भाजून त्यात घालावा.
वाढणी :- १ छोटी वाटी प्रसाद या साहित्यात होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा