साहित्य :-
१. ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे
२. २ ते ३ हिरव्या मिरच्या
३. ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या
४. पेरभर आल्याचा तुकडा
५. बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ चमचे कोर्नफ्लोर
७. चवीनुसार मीठ
कृती:-
बटाटे उकडून सालं काढून किसून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, लसूण व आलं घालावं. या तिन्हीही गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. त्यात कोर्नफ्लोर, कोथिंबीर व मीठ घालून छान गोळा मळून घ्यावा. हाताला तेल लावून या गोळ्याचे गोलाकार छोटे चपटे गोळे बनवावेत. किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या टिक्की बनवाव्या. एका पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून या टिक्की shallow fry करून घ्याव्यात. सॉस किंवा चटणीसोबत गरम गरम serve कराव्यात.
वाढणी :- २ ते ३ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा