साहित्य :-
१. १ कप काजू
२. ३/४ कप पिठीसाखर
३. ३ ते ४ चमचे पाणी
४. चिमुटभर केशर
५. १ चमचा तूप
कृती:-
काजूची मिक्सरमधून अगदी बारीक पूड करून घ्यावी. पिठीसाखर व काजूची पूड छान मिक्स करून घ्यावं. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तूप घालावं. तूप तापलं की त्यात हि पूड घालावी. अगदी मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. थोडंसं तेल सुटायला लागलं की मध्ये आळ करून त्यात पाणी घालावं. त्या पाण्यात केशर घालावं. थोडं ढवळून सगळी काजूची पूड व केशराचे पाणी एकजीव करून घ्यावे. यानंतर अगदी २ ते ३ मिनिट परतावे. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की लगेच एका ताटामध्ये काढून चमच्याच्या मागच्या बाजूने थापून घ्यावे. मिश्रण गार झाले कि वरून त्याला चांदीचा वर्ख लावून हव्या त्या आकारात कापावे.
वाढणी :- या साहित्यात १० ते १२ काजू कतली होतील.
सोनल ताई,ऑनलाईन काजुकतलीच्या बर्याच रेसिपी वाचल्या.
उत्तर द्याहटवापण तुझी हि रेसिपी एकदम सोपी वाटतेय..
करून पाहीन ह्या विकेंडला.
एक सांग, अमेरिकेत चांदीचा वर्ख कुठे मिळेल?
सौ. अवनी
अवनी, छान वाटलं तुझी comment वाचून. या प्रकारे केलेली काजू कतली चवीला अतिशय छान होते. तुला चांदीचा वर्ख कुठल्याही Indian Store मध्ये मिळेल. फक्त तुला check out counter ला विचारावं लागेल. त्यांच्याकडे ठेवतात ते कारण हा वर्ख अतिशय नाजूक असतो.
उत्तर द्याहटवाSunder :)
उत्तर द्याहटवाUdyach sangte kashi zali. Thanks Sonal :)