५ मार्च, २०१०

पोळी







साहित्य :-
१. २ डाव गव्हाची कणिक
२. २ चमचे दही
३. चिमुटभर मीठ
४.१ ग्लास कोमट पाणी
५. तेल
कृती :-

कणकेमध्ये थोडेसे मीठ व २ चमचे दही घालावे. दही घातल्याने पोळी मऊ होण्यास मदत होते. कणिक एकत्र करावी. त्यात हळूहळू कोमट पाणी घालत कणिक मळावी. त्या कणकेचा गोळा झाल्यावर थोडेसे तेल लावून कणिक परत मळावी. ही मळलेली कणिक झाकून ठेवावी. साधारण अर्ध्या तासाने पोळी लाटण्यास घ्यावी. एक छोटा गोळा घेऊन तो थोडा लाटावा व त्याला तेल लावून त्रिकोणी घडी घालावी. ही त्रिकोणी घडी पिठात घोळवून त्याची गोल पोळी लाटावी. तवा मध्यम आचेवर तापला की लाटलेली पोळी तव्यावर भाजून घ्यावी. दही घातल्यामुळे पोळ्या अतिशय मऊ होतात व छान पदर सुटतात.

वाढणी :- या साहित्याच्या साधारण ७ ते ८ पोळ्या होतील

७ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सोनल..
    तू पोळीत दही घालतेस तर पोळीची चव आंबट येत नाही का? आणि रोज करतो त्या पोळ्यात तू दही घालावयाचे, असे म्हणते आहेस का?

    अवनी

    उत्तर द्याहटवा
  2. दही घातल्याने पोळीच्या चवीत काहीच फरक पडत नाही. अगदी रोजच्या कणकेत दही घातलेस तरी चालेल.

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. मग ठीक आहे..
    धन्यवाद सोनल.. आज ट्राय करते..

    तुझी प्रोफाईल पहिली..तू अमेरिकेतच असतेस ना.. मीही अमेरिकेतच आहे actually.. मला पोळ्यांसाठी तू कोणती कणिक वापरतेस, ते सांगशील का प्लीज.. ह्या फोटोतल्या पोळ्या खुप छान दिसत आहेत..

    उत्तर द्याहटवा
  5. he dahi vaparlya mule poli kiti vel tikate mahje asha pakare kelelya polya office la nelya tar chalatil ka ???

    उत्तर द्याहटवा
  6. नक्कीच!! दही घालून केलेल्या पोळ्या एक दिवस नक्कीच टिकतील. अगदी उन्हाळ्यात देखील.

    उत्तर द्याहटवा