साहित्य :-
१. छोटा अर्धा कांदा
२. छोटा टोमॅटो
३. ४ ते ५ कसून पाकळ्या
४. आलं २ चमचे
५. ७ ते ८ ओल्या लाल मिरच्या
कृती :-
कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, लाल मिरच्या या सर्व गोष्टी बारीक चिरून घ्याव्यात. प्रथम तेलावर कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात आलं लसूण घालून परतावे. आलं व लसणाचा वास यायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालावा. सर्वात शेवटी मिरच्या घालाव्यात व अगदी मंद आचेवर हा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवावा. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे शेजवान सॉस तयार होईल.
हा सॉस चायनीज हक्का नुडल्स तसेच फ्राईड राइसमध्ये खूप छान लागतो. या सॉस ने चायनीज पदार्थाला वेगळीच चव येते.
शेजवान सॉस ची रेसिपी नक्की करून पाहू.
उत्तर द्याहटवाखूप कामाची आहे आमच्या हि पाककृती.