पुरीसाठीचे साहित्य :-
१. ३/४ कप रवा
२. १/४ कप मैदा
३. जवळपास अर्धा कप पाणी
कृती:-
वरील साहित्याचा पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट गोळा भिजवावा. एक ओलसर कापड घेऊन हा गोळा त्याने झाकावा. साधारण १५ मिनिटांनी या गोळ्याचे समान भाग करून मोठी पोळी लाटावी. एका छोट्याशा वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्याव्यात. त्या देखील ओलसर कपड्यात झाकून ठेवाव्यात. सगळ्या पुऱ्या तयार झाल्या की गरम तेलामध्ये पुऱ्या तळाव्यात. पुऱ्या तळताना झाऱ्याने त्या तेलात खाली दाबाव्यात. म्हणजे पुऱ्या फुगायला मदत होईल.
अशाप्रकारे पुऱ्या तयार झाल्या की पाणीपुरीचे झणझणीत पाणी बनवावे.
पाणीपुरीचे पाणी
साहित्य :-
१. १ कप पुदिन्याची पानं
२. १ कप कोथिंबीर
३. २ ते ३ मिरच्या
४. ३ चमचे चिंचेचा कोळ
५. ३ चमचे लिंबू रस
६. १ चमचा जीरं पूड
७. १/४ चमचा काळी मिरी पावडर
८. १ चमचा काळं मीठ
९. १/४ चमचा सुंठ पूड
१०. १ चमचा मीठ
११. पाव चमचा हिंग
कृती :-
वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून काढावेत. ही पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेल्या पाण्यात अजून ३ कप पाणी मिसळावे. मिठाचा अंदाज पुन्हा एकदा घ्यावा. पाणीपुरीचे पाणी तयार!!
पाणीपुरीमध्ये पुऱ्या व पाणी हे दोन महत्वाचे टप्पे आपण बघितले. याशिवाय अजूनही काही तयारी करावी लागते. पांढरे वाटाणे साधारण ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावेत. ज्या पाण्यात हे वाटाणे भिजवले आहेत त्या पाण्यासाहित कुकरमध्ये हळद व मीठ घालून हे वाटाणे उकडावेत. पाणीपुरी serve करताना पुरीला मधोमध भोक पडावे व त्यात उकडलेले पांढरे वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिंचेची गोड चटणी, बारीक शेव, कोथिंबीर व सर्वात शेवटी पाणीपुरीचे पाणी घालावे. इतर सर्व जिन्नस पुरीमध्ये घालून केवळ चिंचेची गोड चटणी आणि पाणीपुरीची चटणी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये देऊनही पाणी पुरी serve करता येते.
चिंचेच्या गोड चटणीची कृती blog वर जरूर पहावी.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.
सोनल, मला तुमचा ब्लोग खूप आवडला. मी तुमची नियमित वाचक आहे आणि मी सर्व पाकक्रॄती करुन बघते.
उत्तर द्याहटवातुम्हाला खूप धन्यवाद!!! असंच लिहित रहा !!!
Dhanashree
धनश्री,
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद!!! अशाप्रकारे छान छान comments सकाळी सकाळी वाचायला मिळाल्यावर अजूनच हुरूप येतो. keep visiting!!.....सोनल
chinchecha kol mhanje kay?
उत्तर द्याहटवाओली चिंच पाण्यात भिजवून ठेवायची आणि १५ मिनिटं झाली की ती चिंच हाताने चोळून त्याचा सगळा गर काढून घ्यायचा. राहिलेला चिंचेचा भाग टाकून द्यायचा. जो राहील तो दाटसर गर म्हणजे चिंचेचा कोळ.
हटवामैदा टाकावाचं लागतो का ? नुसता रवा नाही चालणार ??
उत्तर द्याहटवानिवेदिता, रवा घालण्याने पुऱ्या जास्त कुरकुरीत होतात आणि पाणीपुरीसाठी कुरकुरीत पुऱ्याच छान लागतात.
उत्तर द्याहटवा