साहित्य :-
१. चिकन थाईज ४ ते ५
२. १ मोठा कांदा बारीक चिरून
३. १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
४. ४ ते ५ लवंगा
५. ४ ते ५ अक्खी वेलची
६. दालचिनी तुकडा
७. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
८. कसुरी मेथी १/४ कप
९. चवीपुरतं मीठ
१०. तिखट पूड १ चमचा
११. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
१२. गरम मसाला अर्धा चमचा
१३. हळद अर्धा चमचा
१४. सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:-
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झालं की त्यात वेलची, लवंग व दालचिनी घालावी. मग त्यात कांदा घालावा. थोडा परतल्यावर आलं लसूण पेस्त घालावी. ही पेस्ट थोडी परतली की मग त्यात हळद, धणे जिरे पूड घालावी. थोडं परतावं व त्यात टोमॅटो घालावा. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून टोमॅटो छान मॅश होईपर्यन्त शिजवावा. मग या ग्रेव्ही मध्ये तिखट व गरम मसाला घालावा. छान मिक्स करून मग त्यात चिकन घालावा. परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून चिकन शिजू दयावं. मधून मधून चिकन परतावं व आवश्यक वाटल्यास पाणी घालावं. चिकन ८०% शिजलं की त्यात कसुरी मेथी घालावी. मेथी घालताना हातावर एकदा चोळावी जेणेकरून त्याची छान पूड होईल. चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा सर्व जिन्नस मिक्स करून झाकण लावून शिजवावेत. गरम गरम मेथी चिकन रोटी, नान अथवा पराठ्यासोबत serve करावं.
वाढणी :- ३ ते ४ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा