३ ऑगस्ट, २०११

बीट रूट मंचुरियन


साहित्य :-
१. १ बीट किसून
२. १ गाजर किसून
३. अर्धी वाटी फ्लॉवर बारीक चिरलेला
४. अर्धी वाटी श्रावण घेवडा बारीक चिरलेला
५. २ वाट्या उभा चिरलेला कोबी
६. पाव वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
७. अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा
८. २ ते ३ चमचे मैदा
९. ४ चमचे कोर्नफ्लोवर किंवा तांदुळाची पिठी
१०. ४ ते ५ चमचे सोय सॉस
११. ३ ते ४ चमचे टोमॅटो केचप
१२. अर्धा चमचा चिली सॉस
१३. तळणीसाठी तेल


कृती :-
प्रथम किसलेले गाजर, बीट,बारीक चिरलेला श्रावण घेवडा, फ्लॉवर, मैदा व तांदुळाची पिठी सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. एका कढईमध्ये तेल तापवावे व या मिश्रणाचे गोळे करून ते तेलावर छान तळून घ्यावेत. प्रथम एक गोळा करून तळून बघावा. तो जर तेलात फुटला नाही तर इतर गोळे करून घ्यावेत. जर तो तेलात फुटला तर थोडी तांदुळाची पिठी वाढवावी. हे गोळे तयार झाले की ते एका kitchen towel वर काढून घ्यावेत. म्हणजे त्यातल जास्तीच तेल निघून जाईल. कढईमध्ये अगदी कमी तेल घेऊन ते गरम झाले की पहिले कांदा घालावा. मग कोबी, सिमला मिरची व कांद्याची पात घालावी. ह्या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात बीटाचे गोळे अर्थात मंचुरियन घालावेत. अगदी अलगत ते सर्व एकत्र करावं. त्यात सोय सॉस, केचअप व चिली सॉस घालून छान एकत्र करावं. पुन्हा १ चमचा कोर्नफ्लोवर घेऊन ते पाण्यात विरघळवून घ्यावा व भाजीमध्ये घालाव त्याने ही भाजी छान मिळून येईल. एक २ मिनिटे ही भाजी परतून मग एका bowl मध्ये काढावी व कांद्याची पात भुरभुरून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

३ टिप्पण्या:

  1. यावेळी खूप दिवसांनी वाचला ब्लोग. नेहमीप्रमाणे सुंदर पाककृती. तुम्च्याकडून प्रेरणा घेऊन मी पण एक ब्लॊग तयार करणार आहे. पारंपारिक भारतीय पाककृतींचा. बघू कितपत जमतय ते. थोडंसं काही जमलं तर तुम्हाला लिंक देईन.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान धनश्री!! तुझ्या blog ला भेट द्यायला नक्की आवडेल मला. तुझ्या blog साठी माझ्या शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  3. सोनल तुम्हाला link देत आहे. बघा जमलंय का :) फोटो नंतर टाकेन.

    http://paarampaarikpakakrutee.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा