साहित्य :-
१. २ कप किसलेला दुधी
२. १ कप दूध
३. पाव कप खवा
४. १ कप साखर
५. अर्धा चमचा वेलची पूड
६. चिमूटभर केशर
७. काजू व बेदाणे प्रत्येकी ३ चमचे
८. ४ ते ५ चमचे तूप
कृती :-
प्रथम दुध्या किसून घ्यावा. किसायाच्या आधी त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. एका कढईमध्ये तूप घाव. त्यात काजू व बेदाणे घालावेत. काजू सोनेरी झाले व बेदाणे फुगले की त्यात किसलेला दुधी घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून १० मिनिटे दुघी शिजवावा. मध्ये मध्ये झाकण काढून ढवळून घ्यावे. मग त्यात दूध घालावे व दुधी पूर्ण दूध आटेपर्यंत शिजवावा. मग त्यात साखर घालावी. साखर घातल्याने हलवा पुन्हा पातळ होऊ लागेल. अजून ५ मिनिटे सतत ढवळत दुधी शिजला की तो थोडा घट्ट होऊ लागेल. मग त्यात खव्याचा चुरा घालावा. वेलची पूड व केशर घालून छान मिक्स करून घ्यावे. हलवा गार किंवा गरम कसाही serve करावा. दूध व खवा या दोन्ही गोष्टींमुळे हलवा अतिशय रीच होईल.
वाढणी :- २ ते ३ माणसे