साहित्य :-
१. उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे २ कप
२. बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप
३. बारीक चिरलेला कांदा अर्धा कप
४. बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप
५. बारीक चिरलेली कोथिंबिर अर्धा कप
६. बारीक चिरलेली हिरवी मिरची स्वादानुसार
७. बारीक चिरलेली काकडी अर्धा कप
८. जीरा पावडर अर्धा चमचा
९. चाट मसाला अर्धा चमचा
१०. लिंबुरस १ चमचा
११. चवीनुसार मीठ
कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे व स्वीट कॉर्न चाट serve करावी.
वाढणी :- २ ते ३ माणसे